2024 मध्ये, जीवनशैलीच्या आजारांसाठी रुग्णांनी सरासरी 4.1 पट डॉक्टरांचा सल्ला घेतला. हा आकडा 2023 मध्ये 3.4 पट होता. 2024 च्या संशोधनात भारतातील लोकांसाठी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आणि वजन वाढणे यासारखे विषय चिंतेचे ठरले आहेत.
7 एप्रिल रोजी लोकांनी ‘जागतिक आरोग्य दिन’ साजरा केला तेव्हा, भारतीय आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म प्रॅक्टोने 30 दशलक्षाहून अधिक युझर्सच्या डेटावर आधारित त्यांचा वार्षिक आरोग्य अंतर्दृष्टी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात जीवनशैलीच्या आजारांविषयी जागरूकतेत वर्षानुवर्षे 84 टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधोरेखित केले आहे.
2024 मध्ये या संदर्भात संशोधन करण्यात आला. 25-34 वयोगटातील लोकांवर टरिसर्ड करण्यात आला. ज्यामध्ये 2 शहरांमध्ये वर्षानुवर्षे 20 टक्के वाढ झाली आहे.
अहवालात असे दिसून आले आहे की, जीवनशैलीशी संबंधित आजारांसाठी 84 टक्के शोध वर्षानुवर्षे वाढले आहेत. ज्यामध्ये उच्च रक्तदाबाचा समावेश आहे. ज्यामध्ये वर्षानुवर्षे 21 टक्के वाढ झाली आहे. एकूण शोधांपैकी 64 टक्के शोध टियर-१ शहरांमधून होते. सर्वाधिक वाढ टियर-2 शहरांमधून 20 टक्के होती. महिलांच्या तुलनेत जीवनशैलीशी संबंधित आजारांसाठी पुरुषांच्या शोधांचे योगदान 87 टक्के होते, तर सर्व शोधांपैकी सुमारे 48 टक्के शोध 25-34 वयोगटातील होते. जीवनशैलीशी संबंधित आजारांसाठी रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याची सरासरी संख्या 4.1 होती.
मधुमेहाबद्दल चिंता
आजकालच्या जीवनशैलीतील अनेक आजारांपैकी, या प्लॅटफॉर्मवर मधुमेहात 2023 मध्ये 3.4 वरून दरवर्षी 3.9 पर्यंत वाढली आहे. इतकेच नाही तर 2023 ते 2024 पर्यंत मधुमेहाशी संबंधित शोधांमध्ये 13.66 टक्के वाढ झाली आहे. पुरुषांमध्ये 18-24 वयोगटातील 92.59 टक्के इतकी सर्वाधिक वाढ झाली आहे.
उच्च रक्तदाब
मधुमेहाची वाढती चिंता असल्याने, उच्च रक्तदाबाबतही येथे सविस्तर सर्व्हे करण्यात आला आहे. 2023 मध्ये 4.9 वरून दरवर्षी 5.1 पर्यंत वाढ झाली आहे. 35-44 वयोगटातील पुरुषांनी दरवर्षी 5.5 टक्क्यांनी वाढ झाली आगे. उच्च रक्तदाबाशी संबंधित शोधांमध्ये वर्षानुवर्षे 21 टक्के वाढ झाली. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये (160टक्के) आणि ४५-५४ वयोगटातील महिलांमध्ये (307 टक्के) सर्वाधिक वाढ झाली.
हृदयरोग
35-44 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये सर्वाधिक सल्लामसलत वारंवारता 3.2 होती. 2023 ते 2024 पर्यंत हृदयरोगाशी संबंधित शोधांमध्ये 16 टक्क्यांनी वाढ झाली. 18 ते 34 वयोगटातील पुरुष आणि महिलांमध्ये अनुक्रमे 142 टक्के आणि 121 टक्के अशी सर्वाधिक वाढ दिसून आली.
वजन वाढणे
2024 आणि 2023 मध्ये वजन वाढवण्याची सरासरी 2.2 इतकी आहे. 2023 पासून वजन व्यवस्थापनासाठी शोधांमध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
(Disclaimer – वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)