Ghost Call म्हणजे काय? तुमच्या फायद्यासाठी कसा करु शकता वापर? जाणून घ्या!


Ghost Call: तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीत कोणाला कधी घोस्ट कॉल आलाय का? यामुळे तुम्ही घाबरला आहात का? याचं उत्तर हो असेल तर तुम्हाला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल. कारण बरेच यूजर्स स्वतःच्या फायद्यासाठी घोस्ट कॉल वापरतात. जर तुम्हालाही स्वतःसाठी घोस्ट कॉलचा फायदा घ्यायचा असेल? तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

घोस्ट कॉल म्हणजे काय?

घोस्ट कॉलचा फायदा घेण्यापूर्वी घोस्ट कॉल म्हणजे काय हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे. घोस्ट कॉल म्हणजे असा फोन कॉल ज्यामध्ये दुसऱ्या बाजूला कोणीही बोलणारे नसते. याला फॅन्टम कॉल असेही म्हणतात. बऱ्याच वेळा टेलिमार्केटिंग कंपन्या अशा कॉल्सचा वापर करतात. पण तुम्ही तुमच्या फायद्यासाठी घोस्ट कॉलदेखील वापरू शकता. यासाठी ही माहिती तुमच्या खूप उपयोगी येणार आहे. 

घोस्ट कॉलचा तुम्हाला कसा होऊ शकतो फायदा?

बऱ्याचदा तुम्ही अशा ठिकाणी अडकता जिथे तुम्हाला जायचे नसते. त्या ठिकाणचे वातावरण तुम्हाला अगदी कंटाळवाणे वाटते. तुम्ही काहीही न बोलता उठून येथून बाहेर जाऊ शकत नाही. अशावेळी घोस्ट कॉल खूप उपयुक्त ठरतो. यामध्ये तुमचा फोन तुमच्या नियोजित वेळेवर वाजतो आणि तुम्ही फोन उचलता. मग बोलण्याच्या बहाण्याने बाहेर जाऊ शकता.

घोस्ट कॉलची सुविधा कुठे मिळते?

अनेक अॅप्स घोस्ट कॉलिंग देतात. ज्यामध्ये ट्रूकॉलरचा समावेश असतो. अलीकडेच घोस्ट कॉलचे एक मोठे अपडेट आलंय. जे iOS आणि Android डिव्हाइसवर सहजपणे वापरले जाऊ शकते. ट्रूकॉलरचे घोस्ट कॉलिंग फीचर प्रीमियम सबस्क्राइबर्ससाठी उपलब्ध असते. ते अॅक्सेस करण्यासाठी पेड प्लॅन आवश्यक आहे. ट्रूकॉलरवर तुम्ही घोस्ट कॉलरचे नाव आणि फोन नंबर कस्टमाइझ करू शकता. कॉलर आयडी अधिक वास्तववादी दिसण्यासाठी त्यात एक फोटोदेखील जोडू शकता. ट्रूकॉलर यूजर्सना घोस्ट कॉल्स शेड्यूल करण्याची परवानगी दिली जाते. ज्यामुळे ते अधिक विश्वासू दिसतात.

कसे करायचे सुरु?

अ‍ॅप उघडा आणि घोस्ट कॉल पर्याय निवडा. घोस्ट कॉलरचे नाव, फोन नंबर आणि कॉलर आयडी फोटो यासारखी माहिती भरा. तुम्हाला कॉल कधी करायचा आहे ते निवडा. तुम्ही तो लगेच, 10 सेकंदांनंतर, 1 मिनिट, 5 मिनिटे किंवा 30 मिनिटांनंतर शेड्यूल करू शकता. तुम्ही एका वेळी फक्त एकच घोस्ट कॉल शेड्यूल करू शकता. तो नंतरच्या तारखेला सुरू करू शकता. जेव्हा तुम्हाला एखाद्या नको असलेल्या मिटींगमधून जलद सुटकेची आवश्यकता असेल तेव्हा घोस्ट कॉल तुम्हाला मदत करू शकेल.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

online casino slot games real money