राज्यात हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राने 12.50 कोटींची मागणी नोंदवली असतांना प्रत्यक्षात शासनाकडून केवळ 7.84 कोटी रुपयांच निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे अपुऱ्या निधीमुळे के
.
राज्यातील एकूण हळद उत्पादनापैकी 50 टक्केपेक्षा अधिक हळद हिंगोली जिल्ह्यात घेतली जाते. जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव, कळमनुरी व हिंगोली तालुक्यात हळदीचे उत्पादन घेतले जाते. मागील वर्षी जिल्हयात तब्बल 40 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड झाली होती.
राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीचे नवीन वाण उपलब्ध व्हावेत तसेच त्यांना लागवडी पासून ते काढणी पर्यंत योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राला सन 2022 मध्ये मान्यता देण्यात आले. या मान्यतेवरूनही शिंदेगट व ठाकरे गटात श्रेयवाद सुरु झाला होता. शिंदे गटाने या केंद्राला आम्हीच मान्यता दिली असल्याचे सांगत 100 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला आहे.
मात्र मागील तीन वर्षात मंजूर 100 कोटी पैकी केवळ 42 ते 43 कोटी रुपयांचाच निधी या केंद्राला उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील आर्थिक वर्षात केंद्राकडून 12.50 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदवली होती. मात्र शासनाने ता. 27 मार्च रोजी अध्यादेश काढून 7.84 कोटी रुपयांचाच निधी मंजूर केला आहे. यामध्ये सहाय्यक अनुदानासाठी (वेतनेत्तर) 1.84 कोटी रुपये तर भांडवली मत्तेच्या निर्मितीसाठी 6 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या निधीतून केंद्राचा विकास कसा साधावा असा प्रश्न उभा राहिला आहे.
44 वणांची लागवड
या ठिकाणी केंद्राच्या वतीने राज्यासह इतर राज्यातील महत्वाच्या असलेल्या 44 वणांची आठ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. सध्या हळद काढणीला असून ज्या हळदीचे उत्पादन अधिक व वातावरणाला तग धरणारे वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिले जाणार असल्याचे केंद्राच्या सुत्रांनी सांगितले.