सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले बीडच्या तुरुंगात असून त्यांना तुरुंगात मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी ही मारहाण केल्याचे समजते. खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा राग मनात धरून व
.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, बबन गित्तेचा राग असेल न वाल्मीक कराडवर. बबन गित्तेला खोट्या प्रकरणात अडकवले आहे. बापू आंधळे जे खून प्रकरण आहे, या प्रकरणातील खोटा आरोपी आहे बबन गित्ते. बबन गीत्ते नसताना त्याला वाल्मीक कराड जे सांगेल ते बरोबर. तेव्हा त्यावेळेस जो इन्स्पेक्टर होता महाजन त्याचे हे कारस्थान आहे. आता हा महाजन सस्पेंड आहे की नाही ते माहीत नाही आता, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी या घटनेची माहिती दिली आहे. सुरेश धस म्हणाले, वाल्मीक कराड व सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाली आहे. मला या प्रकरणाची माहिती आहे. महादेव गित्ते व अक्षय आठवले यांनी त्यांना मारहाण केली. महादेव गित्ते याला अटक होण्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने वाल्मीक कराडने आपल्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातून ही घटना घडली असेल. या प्रकरणी त्यांच्यात केवळ झटापट झाली. फक्त मारहाण झाली. त्यांना कोणत्याही वस्तूने मारहाण करण्यात आली नाही, अशी माहिती सुरेश धस यांनी एका वृत्तवाहिनीला बोलताना दिली आहे.
दरम्यान, वाल्मीक कराड विरुद्ध बबन गित्ते या परळीतील टोळीयुद्धातून ही घटना घडली आहे. वाल्मीक कराड अगोदर म्हणायचे की, बबन गित्तेला संपवल्याशिवाय मी चप्पल घालणार नाही. तर बबन गित्ते यांनी वाल्मीक कराडला संपवल्याशिवाय मी दाढी करणार नाही असा पण केला होता. बापू आंधळे हत्या प्रकरणात नावे चुकीच्या पद्धतीने गोवली गेल्यामुळे ही मारहाण झाली असावी.