छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. याच सोबत इतरही अनेक आमदार, म
.
शरद पवार गटातील वडगाव शेरीचे बापू पठारे हे एकमेव आमदार आहेत. शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रमात अजित पवार यांच्या मागे बापू पठारे बसले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंचावरून उपस्थितांशी संवाद साधला त्यावेळी आमदार बापू पठारे यांच्या नावाचा देखील उल्लेख केल्याचे दिसून आले, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अजित पवार शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत का अशा चर्चा रंगल्या आहेत.
शिवजयंती निमित्त शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बापू पठारे दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बापू पठारे हे शरद पवार गटाचे एकमेव आमदार आहेत, पण आता ते शरद पवारांची साथ सोडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. यावर स्पष्टीकरण देताना मतदारसंघातील कामानिमित्त भेट घेतल्याचे बापू पठारे यांनी सांगितले आहे.
दरम्यान, सध्या महाविकास आघाडीमधील परिस्थिती फारशी चांगली राहिलेली नसल्याचे दिसत आहे. ठाकरे गटाचे देखील अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. रत्नागिरी येथील माजी आमदार राजन साळवी यांनी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडली व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शरद पवार गटाचे एकमेव आमदार बापू पठारे देखील शरद पवारांची साथ सोडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.