फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या रविवारी पार पडला. अनेक बडे आणि अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव मंत्रिपदासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी त्यांना डावलण्यात आले. छगन
.
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमधून रोष आणि व्यक्त होत आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात घ्यावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. राज्यात ठिकठिकाणी अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन केले जात आहे. छगन भुजबळ हे देखील मतदारसंघात बैठकांचे सत्र सुरू आहे.
छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणारी 4 कारणे
मुलाला बळजबरीने घेतले विधान परिषदेवर छगन भुजबळ यांनी त्यांचा मुलगा पंकज भुजबळ यांना बळजबरीने विधानपरिषदेच्या आमदारपदासाठी उभे केले होते. ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना चांगलीच खटकली होती.
समीर भुजबळांची अपक्ष उमेदवारी समीर भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात जाऊन महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे महायुतीमधील मित्रपक्ष नाराज झाले होते.
पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम छगन भुजबळ यांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात केल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पक्षातील लोक त्यांच्यावर नाराज होते, अशी चर्चा आहे.
नाशिकमधील आमदारांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा छगन भुजबळ यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणारे चौथे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी राजीनाम्याचा दिलेला इशारा. छगन भुजबळ यांना मंत्रिपद देऊ नका, अशी नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांनी अजित पवारांकडे विनंती केली. भुजबळांना मंत्रिपद दिले, तर सर्व आमदार सामूहिक राजीनामा देतील, असा इशारा दिला होता.
‘जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना’ मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे छगन भुजबळ यांनी ‘जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना’ असे म्हणत आपली नाराजी उघडपणे जाहीर केली होती. सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील शेवटपर्यंत आपल्यासाठी प्रयत्न करत होते. मंत्रीपद द्यायचे नव्हते तर मग निवडणुकीला उभे कशाला केले, असा सवाल त्यांनी नाशिकमध्ये झालेल्या समता परिषदेच्या सभेमधून अजित पवारांना केला.