राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे पुण्यात ओबीसी समाजाच्या सदस्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहे. यावर राष्ट्रवादी पुणे अध्यक्ष दिपक मानकर यांनी पलटवार केला आ
.
रविवार 15 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नऊ आमदारांनी शपथ ग्रहण केली. मात्र, पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. यामुळे पुणे, नाशिकसह जागो-जागी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी भुजबळांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले दीपक मानकर? अजित पवारांना दहा मंत्रिपदे मिळाली आहेत, त्यातून त्यांनी चार मंत्रिपदे ओबीसी समाजाला दिली आहेत. पुण्यात ज्या पद्धतीने निदर्शने होत आहे, ते चुकीचे असल्याचे मानकर म्हणाले. अजित पवारांच्या फोटोला जोडे मारले जात आहे. याला आम्ही चोख प्रत्यूत्तर देऊ शकतो, परंतू दादांमुळे आम्ही गप्प आहोत, असेही ते म्हणाले.
दादांनी भुजबळांच्या मुलाला विधान परिषदेवर घेतले छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज भुजबळ यांच्यात निवडून येण्याची क्षमता नाही, त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी अजितदादांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार केले. तुम्ही त्याचे असे उत्तर देत आहात, अशी बोचरी टीका दीपक मानकर यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली, तेव्हा छगन भुजबळ मंत्रिमंडळात येणारे पहिले व्यक्ति होते. आता हे सर्व जे होत आहे, ते चुकीचे आहे. संपूर्ण महाराष्ट्र अजित पवारांसोबत आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराने काहीही फरक पडत नाही, असेही मानकर म्हणाले.
हे ही वाचा…
नाराज छगन भुजबळ झाले मवाळ?:म्हणाले – राग, दुःख, रोष व्यक्त करण्यास मनाई नाही, पण विरोध चांगल्या व सुसंस्कृत शब्दांत असला पाहिजे

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत. मंगळवारी त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. परंतू आता त्यांनी भूमिका मवाळ झाल्याचे दिसत आहे. कुणीही बॅनर लावणे किंवा अपशब्द वापरणे, असे काहीही करू नये, असे आवाहन भुजबळ यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांना केले आहे. सविस्तर वाचा…