पुणे शहरातील वारजे माळवाडी भागात एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या १० व ११ वर्षाच्या दोन विद्यार्थ्यांचा डान्स शिक्षकाने शारिरिक जवळीक साधत लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय डान्स शि
.
याबाबत पोलिस उपायुक्त संभाजी पाटील यांनी सांगितले की, सदर प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीवर पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असून. शाळेच्या प्रशासनाने देखील याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. शाळेतून सदर डान्स शिक्षकाला निलंबीत करण्यात आले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक कारवाई केली आहे.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आक्रमक होऊन त्यांनी शाळेत बुधवारी येऊन आंदेलन देखील केले. शाळा प्रशासनाला याबाबत जाब विचारणा करण्यात आली असून सदर शिक्षक हा दोन वर्षापासून शाळेत शिकवत होता त्याच्या विरोधात इतर काही गैरप्रकार तक्रारी आहे का, याची खातरजमा देखील करण्यात येत आहे.
गंभीर हल्ला प्रकरणात ५ महिन्यांपासून फरार आरोपीला बेड्या
गंभीर हल्ला करून तब्बल पाच महिन्यांपासून फरार असलेल्या एकाला बंडगार्डन पोलिसांनी लोहगाव परिसरातून बेड्या ठोकल्या. राम उर्फ रामा पंडित क्षिरसागर (रा. मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड, गुन्हे निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलिस अमंलदार ज्ञाना बडे, मनोज भोकरे हे पेट्रोलिंग करत असताना ज्ञाना बडे यांना गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात मागील पाच महिन्यापासून फरार असलेला आरोपी लोहगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बंडगार्डन पोलिसांच्या पथकाने आरोपी रामा याला ताब्यात घेतले. ही कारवाई अमंलदार प्रकाश आव्हाड, शिवाजी सरक, मनीश सपकाळ यांनी केली.