Aishwrya Rai First Movie : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय नेहमीच आपल्या कामाने आणि अभिनयाने लोकांची मने जिंकते. ऐश्वर्याच्या अभिनयाचे लोकांना वेड लागते असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. अभिनेत्रीशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होताना दिसतात. यातील अनेक व्हिडिओंमध्ये ऐश्वर्या स्वत:शी संबंधित काही रंजक किस्से देखील सांगताना दिसते. पण तुम्हाला माहित आहे का की, ऐश्वर्याच्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातही पाहायला मिळणार होती. पण, आयत्यावेळी ऐश्वर्याने या चित्रपटाला नकार दिला होता. काय होतं कारण? चला जाणून घेऊया…