राज्यमंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याविरोधात राज्यभरात रान पेटवण्याचे संकेत दिलेत. माझ्या मनात अवहेलनेचे शल्य डाचत आहे. त्यामुळे मी आता राज्यव्यापी दौरा करून ओबीसींचा एल
.
छगन भुजबळ समर्थकांचा बुधवारी नाशिकच्या येवल्यात मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले, मी मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी तुमच्यासाठी संघर्ष करेल. हा संघर्ष करतानाच मी शेवटचा श्वास घेईल. त्यात मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे आपले प्रश्न असतील, तिथे आपण एकजुटीने राहू. मी कायम तुमच्यासोबत असेल. हिंमत ठेवा. वाटा पाहा. तोपर्यंत आपले काम सुरू ठेवा. कदाचित पुढे आणखी एखादे मोठे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला एल्गार करावाच लागेल.
मला सध्या गावागावातून व जिल्ह्याजिल्ह्यातून फोन येत आहेत. भुजबळ साहेब या, ताकद वाढवा असे लोक म्हणत आहेत. हे खरे आहे. मी आता संपूर्ण राज्यात जाऊन ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. मी ओबीसींचा लढा आमदार म्हणून सभागृहात लढेल. तिथे कितीही बंधने आली तरी रस्ते आमच्यासाठी मोकळे आहेत. यावेळी त्यांनी मेरे बारे में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौड आएगा मेरा वक्त भी बदलेगा, तेरी राय भी बदलेगी, अशी शायरी म्हणत आपल्या भविष्यातील वाटचालीचे संकेतही दिले.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…