याला भेट त्याला भेट, दुसऱ्या दिवशी घरी थेट: फडणवीसांच्या भेटीवरून DCM शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले – हा बदल चांगली गोष्ट – Nagpur News



उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यंत्र्यांना कुणीही भेटू शकते, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना विरोधी पक्ष तसेच इतर पक्षाचे नेतेही भेटतात, असे शिंदे म्हणाले. जेलमध्ये ट

.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हिवाळी अधिवेशानाच्या तिसऱ्या दिवशी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसह, विरोधकांकडून ईव्हीएमबाबत सुरू असलेल्या आरोपांवरही भाष्य केले. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी का केली नाही, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

लोकसभेनंतर विरोधक हुरळून गेले होते मुख्यंत्र्यांना कुणीही भेटू शकते, मुख्यंत्री राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना विरोधी पक्ष तसेच इतर पक्षाचे नेतेही भेटतात, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे – फडणवीसांच्या भेटीवर दिली. टोकाची टीका करणारे, संपविण्याची, जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाऱ्यांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसतोय. ही चांगली गोष्ट आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. लोकसभेतील विजयानंतर विरोधक हुरळून गेले होते. त्यांनी मंत्रिमंडळी ठरवले होते, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. ह्याला भेट, त्याला भेट आणि दुसऱ्या दिवशी घरी थेट, अशी ही परंपरा आहे, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

विरोधकांना पायऱ्यांवर बसण्यातच समाधान विरोधी पक्षाने सभागृहात बोलले पाहिजे, आपली मते मांडली पाहिजे. लोकांच्या समस्या आणि प्रश्न मांडण्यासाठी अधिवेशन आहे. त्याला उत्तर द्यायला सरकार सक्षम आहे. परंतु फक्त बाहेर पायऱ्यांवर बसून नौटंकी करायची. त्याच्यात विरोधकांनी समाधान मानलेले आहे, असा टोमणा शिंदेंनी लगावला. विदर्भातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षाने भांडले पाहिजे, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.

2004, 2009 मध्ये विरोध का केला नाही? महाविकास आघाडीच्या बाजुने निकाल लागल्यास ईव्हीएम, निवडणूक आयोग तसेच सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट पण चांगले असते. परंतु, विरोधात निकाल लागल्यास ईव्हीएम आरोप करण्याचे काम करतात, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली. 1982 साली निवडणूक आयोगाने केरळमध्ये ईव्हीएम वापरले होते. 1951 मध्ये कायद्यात दुरुस्ती करून कलम 61 ए प्रमाणे ईव्हीएम वापरण्यास परवानगी दिली. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये ईव्हीएम वापरण्यात आले. 2004 आणि 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीतही ईव्हीएमचा वापर झाला आणि काँग्रेस जिंकली. त्यावेळेस बॅलेट पेपरची मागणी का केली नाही? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना केला. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा उदोउदो करता, असा टोला शिंदे यांनी लगावला.

EVM वरून ओमर अब्दुल्लाह यांनीही काँग्रेसला फटकारले सुप्रीम कोर्टाने देखील बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचे नाकारले आहे. तुम्ही जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही, हारता तेव्हा येतात. ही दुटप्पी भूमिका आहे, असे सुप्रीम कोर्टाने सुनावले होते, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ईव्हीएमवर आरोप करणे सोडा, नाहीतर निवडणुका लढवू नका, अश शब्दांत काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्लाह यांनी काँग्रेसला फटकारले. जनादेशाचा अपमान करू नका, अन्यथा पुढील निवडणुकीत लोक या अपमानाचा बदला घेतील, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24