गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळात अनुपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी विधानसभेत उपस्थित झाले. त्यांच्या उपस्थितीने विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार कालपासून नाॅटरिचेबल आहे, अशी चर्चा सुरू आहे. यामध्ये स्पष्टता या
.
अजित पवार नेमके गेले तरी कुठे अशी चर्चा मंगळवारी विधिमंडळात प्रत्येकाच्या तोंडी होती. कारण शपथविधीत ऐटीत उपस्थित असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेले दोन दिवस दांडी मारली होती. मंत्रीमंडळात मनासारखी खाती मिळावी म्हणून ते दांडी मारीत असल्याची चर्चा होती.
या संदर्भात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ते दिल्लीला आले नसल्याचे सांगितलेहोते. अजित पवार नागपुरातच आहे. त्यांना घशाचा संसर्ग झाला असून तब्येत चांगली नसल्याने ते आराम करीत आहेत याला तटकरे यांनी दुजोरा दिला होता. त्यांच्या निकटवर्तीयांनीही ते नागपुरातच विजयगड निवासस्थानी आराम करीत असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमिवर नाना पटोले यांनी पवारांच्या अनुपस्थितीचा मुद्दा उपस्थित केला होता.
दरम्यान नाना पटोले यांनी मंत्रिमंडळाचा खाते विस्तार अजून झालेला नसल्याने आमच्या प्रश्नांना व चर्चेला उत्तर कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर मंत्रिमंडळाची जबाबदारी सामुहिक असते. त्या नुसार मुख्यमंत्री सर्व प्रश्नांची व चर्चेला उत्तरे देतील. राज्याला सक्षम मुख्यमंत्री मिळालेले आहे असे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितले.