शासनाचा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांवर जोर आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेला टार्गेटही निश्चित करून दिले गेले आहे. मात्र, त्या तुलनेत पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. त्याचाच प्रत्यय कळमनुरी तालुक्याच्या बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी आला. येथे 43 महिला
.

दरम्यान या प्रकरामुळे आता रुग्णालयामध्ये पुरेशी साधनसामग्री उपलब्ध आहे की नाही असा देखील सवाल या निमित्ताने आता उपस्थित होत आहे. शस्त्रक्रियेनंतर त्यांचे व्यवस्थित काळजी घेणे त्याचबरोबर स्वच्छता या सर्व बाबींकडे लक्ष देणे गरजेचे असत मात्र शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांना अशा प्रकारे जमिनीवर झोपवल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अतिशय लाजिरवाणी गोष्ट- खासदार अष्टीकर
ठाकरे गटाचे खासदार नागेश अष्टीकर म्हणाले की, शस्त्रक्रिया केल्यानंतर जर महिलांना जमिनीवर झोपवलं जात असेल तर ती अतिशय धक्कादायक आणि वाईट गोष्ट आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर ती लवकरात लवकर कारवाई केली जाईल. अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे.

मलाईदार खाते हवे, त्यातच नेते मग्न- राऊत
संजय राऊत म्हणाले की, या राज्यात आरोग्य मंत्रीच नाहीत. जे होते त्यांच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एक महिना झाला तरी राज्याला आरोग्य मंत्री नाही. स्वतःला मलाईदार खाते पाहिजेत अन् दुसरीकडे मराठवाड्यातील महिला शास्त्रक्रिया झाल्यानंतर रस्त्यावर थंडीत पडलेल्या असल्याचा आरोप राऊत यांनी केला. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या प्रकारावरून राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.