वृद्ध आणि नोकरदार महिलांसाठी म्हाडाकडून वसतिगृह



म्हाडाने (mhada) सामाजिक बांधिलकी जपत ‘एमएमआर ग्रोथ हब’ (MMR growth hub) मध्ये गृहनिर्मितीसह वृद्ध आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

‘ग्रोथ हब’मधील आठ लाख घरांच्या प्रारूप आराखड्यात यासंबंधीचा समावेश करण्यात आला आहे. आराखड्यानुसार म्हाडाचे मुंबई (mumbai) मंडळ मुंबईत तीन वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी सात वसतिगृहे बांधणार आहेत.

तसेच कोकण मंडळ मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) दोन वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी सहा वसतिगृहे बांधणार आहे. उत्पन्न गटानुसार वसतिगृहे बांधली जाणार आहेत. उच्च उत्पन्न गटातील नोकरदार महिलांसाठीच्या वसतिगृहात जलतरण तलाव, व्यायामशाळा यांसारख्या पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.

निती आयोगाच्या शिफारसीनुसार मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाचा ‘ग्रोथ हब’ म्हणून विकास केला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) त्याचा आराखडा तयार केला आहे.

याच ‘ग्रोथ हब’मध्ये 30 लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या 30 लाखांपैकी चार लाख घरांच्या निर्मितीची जबाबदारी म्हाडाकडे सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी आल्यानंतर म्हाडाने एका विशेष समितीची स्थापना करून यासाठीचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार म्हाडाने चार लाखांऐवजी आठ लाख घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मुंबईत नोकरीच्या निमित्ताने राज्यातूनच नव्हे तर देशभरातून, परदेशातूनही मोठ्या संख्येने महिला येतात. अशा वेळी त्यांना निवासाची योग्य सोय उपलब्ध होत नाही. अशा महिलांना याचा फायदा होईल.

तसेच दुसरीकडे वृद्धांच्या (senior citizen) निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी म्हाडाने ‘ग्रोथ हब’मध्ये वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी (working womens) वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाचे म्हणजे ही वसतीगृहे योग्यरित्या चालवली जावीत यासाठी वसतिगृह चालविण्यासाठी प्रतिष्ठित आणि या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने हैदराबाद, बंगळुरू येथील कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24