साठ्ये महाविद्यालयात रंगणार ‘माध्यम महोत्सव’



मुंबईतल्या अनेक कॉलेजेसमध्ये फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत अनेक महाविद्यालयांमध्ये विविध फेस्टिवल्सचा माहोल पाहायला मिळणार आहे. यात सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थी उत्साहाने सहभाग घेताना दिसणार आहे. 

अशातच विलेपार्ले (vile parle) पूर्व येथील साठ्ये स्वायत्त महाविद्यालयाच्या (sathaye college) मास मिडिया विभागातर्फे माध्यम महोत्सवाचे आयोजन नवनवीन संकल्पना घेऊन केले जाते. याही वर्षी हा माध्यम महोत्सव 9,10 आणि 11 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

अनेक कॉलेज अनेक माध्यमे पण एकच महोत्सव अशी या माध्यम महोत्सवाची टॅगलाईन आहे. माध्यम महोत्सवाचे व्यासपीठ दरवर्षी विविध आणि अनोख्या संकल्पनेवर आधारित असते जे विद्यार्थ्यांना (students) नेहमीच प्रोत्साहित आणि आकर्षित करते.

गेल्या काही वर्षांपासून माध्यम महोत्सवात (madhyam mahotsav) नवनवीन संकल्पना यशस्वीरित्या गाजल्या आहेत. साठ्ये महाविद्यालयातील मास मिडीया (mass media) विभागाचे तसेच इतर विद्यार्थी या महोत्सवाच्या आयोजनाची जीवतोडून तयारी करताना दिसतात.   

या महोत्सवात गायन, नृत्य, नाट्य, लेखन, चित्रकला, रांगोळी, कथा – काव्यवाचन आणि विनोदकथन इ. तसेच इतर अनेक कलाविषयक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

महाविद्यालयीन तसेच आंतरमहाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आत दडलेल्या कलाकारासाठी हा महोत्सव महत्त्वाची पर्वणी ठरतो. 

दरवर्षी विविध महाविद्यालयातील कलाकार विद्यार्थी आपली कला सादर करण्यासाठी या महोत्सवात मोठ्या संख्येने भाग घेतात. तसेच आपली कला सादर करून रसिकांचे पोटभरून मनोरंजन करतात.

माध्यम महोत्सवातील महत्त्वाच्या स्पर्धांचा तपशील पुढीलप्रमाणे :- 

         9 डिसेंबर 2024 

  1. शब्दबंध (निबंध लेखन स्पर्धा) 

  2. रंगरेझ (रांगोळी स्पर्धा)

  3. वारलीची गोष्ट (वारली चित्रकला स्पर्धा

  4. चारोळी मंच (चारोळी स्पर्धा)

  5. रंग-ए-गझल (मराठी गझल स्पर्धा)

  6. काव्यतरंग (स्वरचित काव्य स्पर्धा)

  7. विचारवेध (वादविवाद स्पर्धा)

  8. कथामंथन (कथावाचन स्पर्धा)

  9. हसवेगिरी (विनोदकथन स्पर्धा)

  10. नाट्यसंग्राम (एकपात्री अभिनय स्पर्धा)

         10 डिसेंबर 2024

  1. पोशाख प्रदर्शन (फॅशन शो स्पर्धा)

  2. नृत्यवल्ली (नृत्य स्पर्धा)

  3. सूर निरागस हो (गायन स्पर्धा)

        ऑनलाईन स्पर्धा

  1. तिसरा डोळा (फोटोग्राफी स्पर्धा)

  2. डिजीटल वारसा (रिल मेकिंग स्पर्धा)


हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24