मंत्रिमंडळात कुणाची लागणार वर्णी?: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमदारांचे रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना दिल्लीत बोलावले – Mumbai News



विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. महायुतीच्या गोटात मुख्यमंत्री कोण होणार? अशी चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांची निवड करावी या दृष्टिको

.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागला. पण डिसेंबर उजाडला तरी राज्यात नवे सरकार अस्तित्वात आले नाही. मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावरून शिवसेना व भाजपमध्ये कथित मतभेद निर्माण झाल्यामुळे सरकारचा शपथविधी रखडल्याची माहिती आहे. पण आता भाजपने नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची घोषणा करून शिवसेनेवरील दबाव वाढवला आहे. तसेच महायुतीच्या नेत्यांना आपापल्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड घेऊन दिल्लीला बोलावल्याचीही माहिती आहे.

अमित शहांनी मागवले रिपोर्ट कार्ड

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होण्याची इच्छा असणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागवले आहे. या प्रकरणी ते संबंधित आमदारांचा लोकसभा निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता? त्याने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले होते का? इच्छुक आमदार माजी मंत्री असेल तर त्याने महायुती सरकारच्या काळात कशी कामगिरी केली? त्यांनी मंत्रालयीन कामकाजासाठी किती वेळ दिला? सदर मंत्र्यामुळे महायुतीत अडचण निर्माण होईल अशी परिस्थिती उद्भवली का? त्याने एखादे वादग्रस्त विधान केले आहे का? आदी बाबी तपासणार आहेत. यासाठी अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना आपापल्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड घेऊन दिल्लीला पाचारण केले आहे.

मंत्रिपदासाठी काय आहेत निकष?

भाजपमधील मंत्रीपदाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असणार आहेत. परंतु मंत्रिपदे देताना कोणते निकष असावेत, त्यासंबंधीच्या अटी केंद्रीय नेतृत्वाने दिल्या आहेत. त्या मेरीटनुसार मंत्रिपदे बहाल केली जाणार आहे. भाजपच्या आमदारांसाठीही थोड्या बहुत प्रमाणात उपरोक्त अटीच आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या आमदाराच्या एकूण कामगिरीचा आढावा घेतला जाईल. या प्रकरणी सदर आमदाराची मंत्रिमंडळ बैठकांना असणारी उपस्थिती, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची क्षमता, विशेषतः विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता आदी गोष्टी तपासून पाहिल्या जाणार आहेत. या गोष्टींची पूर्तता करणाऱ्या आमदारांचाच मंत्रिमंडळात समावेश केला जाईल. त्यातही प्रामुख्याने तरुण नव्या चेहऱ्यांना संधी देण्यास प्राधान्य दिले जाईल.

महायुती सरकारचा 5 तारखेला शपथविधी

दरम्यान, महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा. आझाद मैदानावर होईल. त्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही घटकपक्षांतील आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यात भाजपच्या 20, शिवसेनेच्या 10 ते 12 व राष्ट्रवादीच्या 9 ते 10 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24