अजितदादांचा शरद पवारांना झटका: माजी आमदार राहुल जगताप यांनी घेतली अजित पवारांची भेट; ‘तुतारी’ची साथ सोडण्याची शक्यता – Mumbai News



विधानसभा निवडणुकीतील हाराकिरीनंतर आता अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जोरदार हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे. शरद पवार गटाचे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट

.

विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात मोठी इनकमिंग झाली होती. पण प्रत्यक्ष निवडणुकीत झालेल्या हाराकिरीनंतर आता या पक्षातून आऊटगोईंगही सुरू झाली आहे. श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप लवकरच शरद पवारांच्या पक्षाला रामराम ठोकून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची माहिती आहे.

राहुल जगताप यांना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. पण महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटली होती. या पक्षाने येथून अनुराधा नागावडे यांना संधी दिली होती. यामुळे नाराज झालेल्या जगताप यांनी बंडखोरी केली होती. यामुळे पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईमुळे नाराज झालेल्या जगताप यांनी शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत. विशेष म्हणजे राहुल जगताप यांनी नुकतीच अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीमुळेही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने जोर धरला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल जगपात हे सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमअध्ये प्रवेश करणार आहेत. पण त्याची पुष्टी अद्याप झाली नाही.

श्रीगोंद्यात झाली होतीत तिरंगी लढत

श्रींगोदा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे विक्रम पाचपुते, महाविकास आघाडीच्या अनुराधा नागावडे व राहुल जगताप यांच्यात तिरंगी लढत होती. त्यात पाचपुते यांनी बाजी मारली होती. पाचपुते यांना 98 हजार 931, तर नागावडे यांना 53 हजार 96 मते मिळाली होती. त्या तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या होत्या. अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या राहुल जगताप यांना 62 हजार 37 मते पडली होती. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढली असती तर ते विजयी झाले असते असा दावा केला जात आहे. हे ही वाचा…

मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री पदच नव्हे तर इतरही कारणामुळे सरकार पेचात:संजय राऊत यांनी व्यक्त केली शंका; मोदी-शहांवरही निशाणा

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठ दिवस झाले असले तरी अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केवळ मुख्यमंत्री पद किंवा गृहमंत्र्यालयावरुन हा पेच थांबलेला नसल्याची शंका राऊत यांनी उपस्थित केली आहे. फडणवीस यांच्या जागी दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री असेल का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24