मुंबईतील ‘या’ रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर तात्पुरती बंद



6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य अनुयायी मुंबईत दाखल होतील. तेव्हा होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वने काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत ही बंदी लागू असणार आहे. (Mumbai Local Train) 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मोठ्या संख्येने दादर येथील चैत्यभूमी येथे येतात. अशावेळी प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 6 डिसेंबर रोजी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी ज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्यांना या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. 

मुंबई कोणत्या स्थानकांत बंदी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण


हेही वाचा

पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार


भारतीय रेल्वेचे पॅन-इंडिया सुरक्षा मोबाइल ॲप लाँच



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24