रेल्वे कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी मध्य रेल्वे कर्मचारी संघातर्फे लढा उभारण्यात येईल, असे आश्वासन मध्य रेल्वे कर्मचारी संघातर्फे देण्यात आले.
.
मध्य रेल्वे कर्मचारी संघाचे भगवंत कुलकर्णी म्हणाले, रेल्वे खात्याकडून सध्या घोषित करण्यात आलेल्या दोन्ही पेन्शन योजना निष्प्रभ आणि कामगारांना त्रासदायक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण होणार आहे. तसेच कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, महिलांसाठीच्या सोयींचा अभाव आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या एस. सी, एस. टी. संघटना, ओबीसी संघटना, ट्रॅकमन असोसिएशन, गॅंगमन असोसिएशन अशा एकूण १० संघटनांनी मध्य रेल्वे कर्मचारी संघाला पाठिंबा दिला आहे, असेही श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. ४, ५, ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी मध्य रेल्वे कर्मचारी संघाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन नितेश उडाणशिव यांनी केले.
ऑल इंडिया एस.सी. एस.टी. रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे झोनल सचिव टी.बी. वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी नितेश उडाणशिव, रविंद्र नाशिककर, श्रीधर खेडगीकर, सुहास कुलकर्णी, प्रमोद जाखलेकर, रविंद्रयन आदी उपस्थित होते.एमआरकेएसतर्फे दुचाकी फेरी काढण्यात आली.