.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर…
अपडेट्स
ढगाळ वातावरणामुळे तापमानात 3-4 अंश वाढ, थंडीची तीव्रता कमी
नाशिक – बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये जोरदार पाऊस झाला असून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार झाल्याने थंडीची तीव्रता कमी झाली आहे. किमान तापमानात तीन ते चार अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. 5 डिसेंबरपर्यंत राज्यात ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज नागपूर वेधशाळेने वर्तवला आहे. पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये बर्फवर्षाव होत असल्याने तिकडून राज्याकडे ताशी 20 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गेले चार दिवस थंडीचा कडाका वाढला होता. मात्र, शनिवारी पश्चिमच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये ढगाळ वातावरणासह मुसळधार पाऊस, तर रविवारी महाराष्ट्रात अंशतः ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाली. यामुळे नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला.
माजी कुलगुरू शिवराज नाकाडे यांचे निधन
लातूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष, तथा दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शिवराज नाकाडे (89) यांचे रविवारी निधन झाले. सायंकाळी 6 वाजता लातूर शहरानजीकच्या गंगापूर येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. नाकाडे यांनी शिक्षण संस्थाचालक, कुलगुरू, प्राचार्य, म्हणून शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान दिले. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य म्हणूनही त्यांनी मराठवाड्याच्या विकासाला चालना दिली. त्यांच्या पश्चात 1 मुलगा व 2 मुली असा परिवार आहे.
आंदेकर खून : आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढीसाठी अर्ज
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील 18 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज गुन्हे शाखेकडून न्यायालयात दाखल करण्यात आला. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी आंदेकर खून प्रकरणातील आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ पोलिसांना दिली. आंदेकर खून प्रकरणातील तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, असा अर्ज विशेष न्यायालयात दाखल केला. या प्रकरणात 22 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. आदेकर खून प्रकरणाचे मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, प्रकाश कोमकर, गणेश कोमकर यांच्यासह साथीदार येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. आरोपींविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे. गंभीर गुन्ह्यात आरोपपत्र दाखल करण्याची मुदत 90 दिवसांची आहे.
मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्लॅटफॉर्म तिकीट विक्री केली बंद
मुंबई – महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर 2 ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देश-विदेशातील लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी घेत हा निर्णय घेतला.
बांगलादेशात चिन्मय प्रभूंच्या अटकेविरुद्ध मुंबईत इस्कॉनचे भजन आंदोलन

बांगलादेशात हिंदू धर्मगुरू चिन्मय कृष्णदास प्रभू यांना अटक करण्यात आली आहे. याविरोधात राधा गोपीनाथ इस्कॉन मंदिराच्या भक्तांनी रविवारी भजन करून निषेध नोंदवला. तसेच या प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालून, प्रभु यांची सुटका करावी, अशी मागणीही या वेळी केली.
दिव्यांगास एक हजार लाचमागणारा तलाठी निलंबित
हिंगोली – राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतनयोजनेच्या प्रस्तावावर स्वाक्षरी वशिक्का देण्यासाठी, 1 हजार रुपयांचीलाच मागणाऱ्या तलाठ्यास निलंबितकेले आहे. फाळेगाव (ता. हिंगोली)येथील तलाठी माधव भालेराव यानेलाच मागितली होती. याप्रकरणीगुन्हा दाखल होताच निलंबनाचेआदेश जिल्हा प्रशासनाने काढले. तक्रारदारांचा नातेवाईक 40 टक्केदिव्यांग आहे. त्यासाठी इंदिरा गांधीराष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनेचेअनुदान मिळण्यासाठी तक्रारदाराने,तलाठी सज्जा कार्यालयात 13नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल केला.मात्र तलाठी भालेराव याने प्रस्तावावरस्वाक्षरी व शिक्का देण्यासाठी 1हजार रुपये लाच मागितली.तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपतप्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखलकेली होती. याबाबत पडताळणीकेल्यानंतर 14 नोव्हेंबरला पोलिसउपअधीक्षक विकास घनवट, पोलिसनिरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्लअंकुशकर यांच्या पथकाने सापळारचला होता. मात्र तलाठी भालेरावयास संशय आल्याने त्याने लाचेचीरक्कम घेतली नाही. मात्र त्यानेपंचांसमक्ष लाच स्वीकारण्याससहमती दर्शविली होती.
शेतकरी 6 डिसेंबरला दिल्लीत धडकणार
चंदिगड – किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) कायदेशीर हमीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलक शेतकरी नेत्यांनी रविवारी आपली पुढील रणनीती जाहीर केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करत किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सर्वणसिंग पंढेर आणि इतर म्हणाले की, 18 फेब्रुवारीपासून चर्चा झालेली नाही. केंद्र सरकारला कंत्राटी शेती लागू करायची आहे, ती आम्हाला मान्य नाही. 6 डिसेंबरला शेतकऱ्यांचा एक गट पायी दिल्लीकडे कूच करणार आहे. ते दिवसा पायी कूच करतील आणि जिथे रात्र मुक्कामी थांबतील.