गेेल्या काही दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थंडीत कुडकुडत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी ‘दिव्य मराठी’ने प्रकाशित केल्यानंतर आता शहरातील विद्यार्थी संघटना या प्रश्नावर पुढे आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने शाळांच्या वेळेत बदल करावेत. परीक्ष
.
शाळेत विद्यार्थी नियमित आले पाहिजेत. यासाठी विद्यार्थी हिताचे निर्णयदेखील घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी सुरक्षाही विचारात घ्यावी, असेही विद्यार्थी संघटनांनी म्हटले आहे.
एक तास शाळा पुढे ढकला \गेल्या आठ दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आजारी पडण्याचे आणि गैरहजर राहण्याचे प्रमाणही वाढले आहे. याचा परिणाम अभ्यासावरही होतो. त्यामुळे शाळांची वेळ एक तास पुढे ढकलावी.
– सुशील बोर्डे , शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरद पवार गट )
थंडीमुळे आरोग्याच्या समस्या; निवेदन देणार विद्यार्थ्यांचे हित महत्वाचे आहे. थंडीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन शाळांच्या वेळ पुढे घेण्याची भूमिका घेऊ.
– मंगेश साळवे, जिल्हाध्यक्ष, मनविसे
पालकांशी चर्चा करू थंडीमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्य देखील महत्त्वाचे आहे. यासंदर्भात पालकांशी चर्चा करू. पालकांनी घेतलेल्या भूमिकेसोबत उभे राहू.
– चिन्मय महाले, महानगरमंत्री, अभाविप
शाळेची वेळ बदलून हवे तर अतिरिक्त तास घ्या
शाळा व्यवस्थापनाने शिक्षण विभागाशी चर्चा करून वेळा बदलण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. सकाळच्या सत्रातील शाळेत एक ते दोन तासांचा बदल करावा. त्याऐवजी अतिरिक्त तास घेऊन वेळ भरून काढावी. विद्यार्थ्यांची कडाक्याच्या थंडीतून सुटका होईल.
– हनुमान शिंदे, जिल्हाप्रमुख, युवासेना (उद्धवसेना)