नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा एकतर्फी विजय झालेला आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर राजकीय पक्ष
.
एका अंदाजानुसार येत्या काही महिन्यातच नगर परिषदेच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता असून मोर्शी शहरातून डॉ. प्रदीप कु-हाडे, निलेश रोडे, नितीन उमाळे, विपुल भडांगे, रवींद्र गुल्हाने व मोहन मडघे यांचेसह अनेक उमेदवार आपले नशीब अजमावणार असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने स्थानिक पुढाऱ्यांमध्ये चर्चेच्या फैरीही झडत आहेत. एकंदरीत शहरासह ग्रामीण भागात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते सुद्धा काही दिवसातच पुन्हा सक्रिय होणार, अशी चिन्हे दिसून येत आहे. मोर्शी नगर परिषदेमधील नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा कार्यकाळ २०२१ ला संपला. तेव्हापासून नगर परिषदेमध्ये प्रशासक कार्यरत आहे. नगराध्यक्ष व नगरसेवक सत्तेमध्ये नसल्याने शहरातील अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांनासुद्धा मोठा त्रास होत आहे. येत्या काही महिन्यातच नगर परिषदेची निवडणूक होणारअसल्याचे सुतोवाच केल्या जात असल्याने उमेदवारांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहे.
सन २०९१ ला भाजपाच्या शीला रोडे यांच्या निधनामुळे नगराध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. भाजपा च्या ताब्यात असलेली ही जागा पुढे राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडे घेण्यात यश मिळवले होते. सन २०१९ मध्ये झालेल्या मोर्शी नगर परीषदेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेघना मडघे ७ हजार ३४३ मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. यावेळी भाजप दुस-या तर कॉंग्रेस तिस-या क्रमांकावर होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेससह चार उमेदवार रिंगणात होते. यावेळी १६ हजार ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
अशी झाली होती नगराध्यक्ष पदाची निवडणूक
मेघना मडघे यांना १० हजार ८२० मते, कॉंग्रेसच्या स्वाती पन्नासे यांना १ हजार ६२३ मते, भाजपाच्या अश्विनी वानखडे यांना ३ हजार ४७७ मते, अपक्ष सुनीता कुमरे यांना १३४ तर पूनम शाह यांना १३२ मते मिळाली होती.