पोटाची खळगी भरण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही संत्रातोड मजुरांना काम करावे लागते. अंगमेहनतीचे काम केल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी थकवा येतो. त्यामुळे संत्र्यांच्या पेट्यांनी भरलेल्या ट्रकच्या वरच्या भागावर ते पहुडतात. पण बेसावधपणे झोपलेल्या याच मजुरांना कध
.
मोर्शी, वरुड परिसर हा संत्र्यासाठी प्रसिद्ध परिसर आहे. या परिसरात त्यामुळेच संत्र्यांची मोठी बाजारपेठ उभी राहिली असून संत्र्यांची ने-आणही याच परिसरातून केली जाते. मोर्शी वरुड भागात संत्रा व मोसंबी मोठ्या प्रमाणात पिकत असल्याने हे फळ तोडताना मजुरांची मोठी संख्या राहते. बगीचातून संत्रा तोडल्यानंतर तो दुसऱ्या राज्यात किंवा बरेचवेळा दुसऱ्या देशात सुद्धा पाठविल्या जातो. बगीचामधून ही संत्रा नेण्याकरिता ट्रकचा वापर केला जातो. एक बगीचा तोडण्या करीता ३० ते ४० किंवा त्यापेक्षाही जास्त मजूर लागतात.
संत्रा तोडणी झाल्यावर व ट्रक मध्ये संत्रा किंवा मोसंबी भरल्यानंतर या मजुरांना बसायला जागा रहात नाही पर्यायाने ट्रकच्यावर बसून त्यांना प्रवास करावा लागतो. तोडलेली संत्री ट्रकमध्ये भरल्यानंतर त्यावर सोबत आणलेली शिडी ठेवून त्यावर बसून बऱ्याचवेळा त्यांना धोकादायक प्रवास करावा लागतो. या मजुरामध्ये महिलांचासुदधा मोठा सहभाग असतो. यातील काही महिला ड्रायव्हरच्या केबिनमध्ये बसतात. मात्र जागेअभावी अनेक महिला व पुरुषांना ट्रकच्या छतावर बसूनच प्रवास करावा लागतो. प्रवास करताना वर धरायला काहीही साधन रहात नाही. त्यामुळे गतिरोधक आल्यास किंवा चालकाने अचानक ब्रेक लावल्यास पडण्याची सुद्धा भीती राहते. उदरनिर्वाहामुळे या मजुरांना या कडाक्याच्या थंडीतही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.