जर ईव्हीएम विषयावर मनसेला आक्षेप असेल तर आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरेंना साद घालत महाविकास आघाडीत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच आता यावर राज ठाकरे काय प्रति
.
जयंत पाटील म्हणाले, लोकशाही वाचविण्यासाठी जे आमच्यासोबत येतील ते येऊ शकतात. विधानसभा निवडणुकीत इतके पैसे वाटले, त्यामुळे आचारसंहिता अस्तिवात होती असे वाटले नाही. त्यामुळे, मनसेची इच्छा असेल आणि आम्हाला जे वाटते तेच त्यांना वाटत असेल तर त्यांना सोबत घेऊ.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, विरोधी पक्षनेते पद मिळेल, एवढे आमच्या पक्षांकडे मत नाही, सत्तारूढ पक्षांनी मनाचा मोठेपणा दाखवला तर विरोधी पक्षनेता पद दिले तर विधानसभा व्यवस्थित चालवता येतील. मुख्यमंत्री पदावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीला 49 जागांवर विजय मिळाला असून एकाही पक्षाला विधानसभा विरोधीपक्षनेते पदासाठी आवश्यक असलेलं 29 जागांचे संख्याबळ गाठता आले नाही. दरम्यान, मी आहे तिथेच आहे, त्यांच्याकडे बहुमत असून आमचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर आम्ही काय बोलणार, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, या विधानसभा निवडणुकीत मनसेला चांगलाच फटका बसला आहे. 128 जगांवर उमेदवार उभे केले होते, मात्र जवळपास 100 उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहेत. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज राजीनामा दिला आहे. तसेच मनसेचे एकुलते एक आमदार राजू पाटील यांचा देखील या निवडणुकीत पराभव झाला आहे.