उद्धव ठाकरे सोबत असते तर आणखी बहुमत मिळाले असते: आधी सारखेच आताही सुरळीत सुरू राहिले असते, भाजप नेते रावसाहेब दानवे यांचे विधान – Mumbai News



उद्धव ठाकरे सोबत असते तर आज जेवढे बहुमत मिळाले आहे, त्यापेक्षा जास्त बहुमत आम्हाला मिळाले असते, असे विधान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केले आहे. शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत गेली नसती तर 2014 ते 2019 या काळात जसे सरकार चालवले गेले

.

विधानसभा निवडणुका पार पडल्या, आता सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसेच मुख्यमंत्री कोण होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष आहे. यावर बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, मुख्यमंत्रिपद कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे, मात्र मुख्यमंत्री कोण हे आमचे ठरले आहे. मात्र जोपर्यंत वरिष्ठांची सही होत नाही, तोवर अधिकृतरित्या नाव जाहीर केले जात नाही, असा आमच्या पार्टीचा विषय आहे. जोवर वरिष्ठांचा शिक्का बसत नाही, तोवर मुख्यमंत्रिपदी कोण? याबाबत कुठलीही घोषणा होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रावसाहेब दानवे म्हणाले, सगळे ठरल्याप्रमाणेच होणार आहे, प्रसंग, वेळ पाहून आम्ही सगळे करत असतो. वेळही ठरवली आहे, तारीखही ठरवली आहे. पाच तारखेला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे, आधी विधिमंडळ पक्षाची बैठक होईल, नेता निवडला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल. जो कोणी आमचा नेता निवडला जाईल तो आमचा मुख्यमंत्री असेल. सगळे ठरले आहे. बॉसचा शिक्का झाला की सगळे समजेल, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, शिंदे नाराज असल्याचे वृत्त रावसाहेब दानवे यांनी फेटाळून लावले आहे. एकनाथ शिंदे बिलकुल नाराज नाहीत. केवळ वर्तमानपत्र आणि चॅनलला चाललेली ही बातमी आहे. ते स्वतःच्या गावी गेले होते. यात शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच नाही, असे दानवे म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24