राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे. रोहित पाटील यांना मुख्य प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रतोदपदी उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षनेत्याबाबत लवकरच न
.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आज पक्ष कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली. तसेच पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित पाटील यांची तर प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली.
विधीमंडळातील विधानसभेचे काही सदस्य बैठकीसाठी उपस्थित न राहिल्यामुळे विधीमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत पुढील काळात होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. आज 10 पैकी 9 सदस्य बैठकीसाठी उपस्थित होते. असे जयंत पाटील यांनी सांगितले.
विधीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न धडाडीने मांडेल. आमची संख्या कमी असली तरी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात आमचे विधानसभेचे सर्व सदस्य चांगली कामगिरी करतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
बातमी अपडेट करत आहोत…