bhool bhulaiyaa 3 box office collection : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीत पहिल्या दिवशी कमाई करण्याचे सर्व विक्रम मोडले आहेत. प्रदर्शनाच्या दिवशी कार्तिक आर्यनच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत ‘भूल भुलैया २’ (१४.११ कोटी), ‘सत्यप्रेम की कथा’ (९.२५ कोटी) आणि ‘पती पत्नी और वो’ (९.१० कोटी) या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. ‘भूल भुलैया ३’ ला ३० कोटींपेक्षा जास्त ओपनिंग मिळेल, असा दावा निर्माते सातत्याने करत होते आणि तसेच झाले आहे.