विभक्त राहत असलेल्या पत्नीने पतीच्या घराचे कुलूप तोडले: चोरी करत पतीचे वापरातील कपडे जाळले, पत्नीवर गुन्हा दाखल – Pune News



कौटुंबिक वादातून पतीपासून सोलापूर येथे विभक्त राहत असलेल्या पत्नीने माहेरच्या व्यक्तींसह पतीच्या घरी येऊन त्याच्या घराचे कुलूप तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर घरातील दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ,लॅपटॉप व मोबाईल असा मुद्देमाल चोर

.

याबाबत अनय सूर्यकांत कांबळे (वय -37, राहणार- वाडेफाटा ,तालुका- हवेली ,पुणे )यांनी तक्रार दाखल केली आहे .अनय आणि रेणुका यांचे 2014 मध्ये लग्न झाले होते .त्यानंतर आणि रेणुका सासरी राहत असताना तिचे पती सोबत कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. त्यामुळे ती पतीस काही न सांगता मुलांसह माहेरी सोलापूर येथे सातत्याने निघून जात होती .सन 2022 मध्ये तक्रारदार यांच्या पत्नीने त्यांच्या विरोधात सोलापूर येथील कौटुंबिक न्यायालय येथे पोटगी व कौटुंबिक हिंसाचार अधिनियम अन्वये दावा दाखल केला. त्याची सुनावणी अद्याप पर्यंत सुरू आहे .मात्र ,पत्नीने सासरच्या व्यक्तींसह पतीच्या वाडेफाटा येथील घरी येऊन घराचे कुलूप तोडून आत मध्ये बेकादेशीर प्रवेश केला .तसेच घरातील मुद्देमाल चोरी करून पतीचे वापरातील कपडे जाळले आहेत. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक हेच घोरपडे पुढील तपास करत आहे.

घराचे लॉक तोडून चार लाखांची चोरी

पुण्यातील महर्षीनगर परिसरात शत्रुंज विहार सोसायटी येथे राहणाऱ्या संजय रूपचंद गोंदे (वय 61 )यांच्या फ्लॅट कुलूप लावून बंद असताना ,कुणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या समतीशिवाय बनावट चावी साह्याने घराचा दरवाजा उघडला. घरातील लोखंडी कपाट कशाच्या तरी साह्याने उचकटून त्यामध्ये ठेवलेली रोख रक्कम सोन्याचे दागिने व चांदीची नाणी असा चार लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस पुढील तपास करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24