काँग्रेसची 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर: औरंगाबाद पूर्वमधून देशमुख, जालन्यातून गोरंट्याल, सावनेरमधून अनुजा केदार यांना संधी


मुंबई21 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

काँग्रेसने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी आपली 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून मधुकर देशमुख, सावनेरमधून अनुजा सुनील केदार, नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव, जालन्यातून विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल व निलंगा येथून अभयकुमार साळुंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. काँग्रेसने आपल्या यापूर्वीच्या पहिल्या यादीत 48 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर शनिवारी जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत 23 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत काँग्रेसने भुसावळ (राखीव) मतदारसंघातून राजेश तुकाराम मानवतकर यांना संधी दिली आहे. तर जळगाव (जामोद) येथून स्वाती संदीप वाकेकर यांना मैदानात उतरवले आहे.

खाली वाचा यादी जशास तशी

  1. डॉ. राजेश तुकाराम मानवतकर – भुसावळ (राखीव)
  2. डॉ. स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोद)
  3. महेश गांगणे – अकोट
  4. शेखर प्रमोदबाबू शेंडे – वर्धा
  5. अनुजा सुनील केदार – सावनेर
  6. गिरीश कृष्णराव पांडव – नागपूर दक्षिण
  7. सुरेश यादवराव भोयर – कामठी
  8. पूजा गणेश थावकर – भंडारा (राखीव)
  9. दलीप वामन बनसोड – अर्जुनी – मोरगाव (राखीव)
  10. राजकुमार लोटुजी पुरम – आमगाव (राखीव)
  11. प्रो. वसंत चिंडूजी पुरके – राळेगाव
  12. अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मंगुळकर – यवतमाळ
  13. जितेंद्र शिवाजीराव मोघे – आर्णी (राखीव)
  14. साहेबराव दत्तराव कांबळे – उमरखेड (राखीव)
  15. कैलास किसनराव गोरंट्याल – जालना
  16. मधुकर कृष्णराव देशमुख – औरंगाबाद पूर्व
  17. विजय गोविंद पाटील – वसई
  18. काळू बधेलिया – कांदीवली पूर्व
  19. यशवंत जयप्रकाश सिंह – चारकोप
  20. गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा
  21. हेमंग ओगळे – श्रीरामपूर (राखीव)
  22. अभयकुमार सतीशराव साळुंखे – निलंगा
  23. गणपतराव आप्पासाहेब पाटील – शिरोळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24