राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटप निकाली निघाले असून, काँग्रेसची अंतिम उमेदवार यादी आज सायंकाळपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना दिली.
.
महाविकास आघाडीचे जागावाटप मेरिटनुसार झाले. त्यात जिंकण्यास सक्षम असणाऱ्या पक्षाला प्राधान्य दिले गेले. आता आमच्यात कोणताही तिढा उरला नाही. आम्ही एकमेकांना विडा भरवला आहे. महाराष्ट्रात जेवण झाल्यानंतर विडा खाण्याची परंपरा आहे. आम्ही खाल्ला आहे. आता महायुतीमध्येच तिढा वाढला आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत