Happy Birthday Parineeti Chopra : आज बॉलिवूडची बबली गर्ल आणि बहु-प्रतिभावान अभिनेत्री परिणीती चोप्रा हिचा वाढदिवस साजरा करत आहे. परिणीतीचा जन्म २२ ऑक्टोबर १९८८ रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. फार कमी लोकांना माहित असेल की, परिणीती चोप्राला कधीही नायिका बनायचे नव्हते. परंतु, २००९मध्ये आलेल्या आर्थिक मंदीने तिला चित्रपटसृष्टीत येण्यास भाग पाडले. चला तर, परिणीतीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कधीच न ऐकलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया…