दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार पित्याचा मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात एरंडोल ते पहूर पाळधी रस्त्यावर नेरी गावाजवळ दुपारी १२ वाजेच्या सुमारास झाला. समाधान वना चौधरी वय (वय ४०) रा.वराड असे मृताचे नाव आहे. तर मुलगा
.

धरणगाव तालुक्यातील वराड येथील समाधान चौधरी हे रविवारी गावामध्ये महाशिव पुराण कथेच्या समारोपाच्या कार्यक्रमास सकाळी उपस्थित होते. नंतर ते घरी पत्नी कल्पना चौधरी यांना, मी एरंडोल येथे मुलगा दुर्गेश याला कपडे घेण्यासाठी जात आहे असे सांगून निघाले. मुलगा दुर्गेश व वडील हे समाधान हे दोन्ही पितापुत्र एरंडोल येथे गेले. तेथून हे दोघंही दुचाकीने आपल्या सासरी पहूर पाळधी येथे जात असताना त्यांचा अपघात झाला. नेरी जवळ कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेहे पिता-पूत्र गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना वडील समाधान चौधरी यांचा मृत्यू झाला. यावेळी त्यांचे कुटंबीय, नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मृत्यूपूर्वी समाधान यांनी आपल्या आईशी संवाद साधला व जीव सोडला. दरम्यान मुलगा दुर्गेश याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समाधान चौधरी हे वराड येथे छोटेमोठे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, एक मुलगी व आई असा परिवार आहे.