बॉलिवूडमधील सर्वांचे लाडके कपल म्हणून ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर ओळखले जातात. नेहमी दोघांमधील उत्तम केमिस्ट्री आणि नात्याविषयी चर्चा रंगते. दोघेही खासगी आयुष्यावर फार कमी बोलताना दिसतात. पण अनुपम खेर यांनी नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी स्वत:ला मूलबाळ नसण्याची पोकळी जाणवत असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री किरण सोबत लग्न केलेल्या अनुपम यांनी आपल्या सावत्र मुलगा सिकंदर खेरसोबतच्या नात्याशी या सगळ्याचा संबंध नसल्याचे सांगितले आहे.