महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आणखी दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मनसेकडून राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून तर अविनाश जाधव ठाण्यातून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. मनसेचे अध्यक
.
राज ठाकरे म्हणाले, निवडणुकीतील उमेदवारांच्या यादीवर हात फिरवला जात आहे. आज किंवा उद्या पक्षाची दुसरी यादी जाहीर होईल. यादी जाहीर होण्यापूर्वी राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांची उमेदवारी जाहीर करतो, असे ठाकरे म्हणाले. 24 तारखेला अविनाश जाधव आणि राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी येणार आहे. अर्ज भरतेवेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यावे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले आहे.
बातमी अपडेट करत आहोत…