जरांगेंवरील टीकेवरून केणेकरांची भाजप श्रेष्ठींकडून कानउघाडणी: वादग्रस्त वक्तव्यांपासून दूर राहण्याचे बजावले – Chhatrapati Sambhajinagar News



मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची कानउघाडणी केली. त्याचबरोबर अशा वक्तव्यापासून दूर राहण्याचेही त्यांना बजावले.

.

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या रोषाला सामोरे जात फटका सहन करावा लागला होता. आता विधानसभेच्या तोंडावर त्यांच्यावर टीका करून केणेकर यांनी पक्षाच्या अडचणीत भर घातली. राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वावर टीका केल्यानंतरही जरांगे यांना उत्तर देण्याचे टाळले जाते. अशातच केणेकरांनी जरांगे यांच्या वक्तव्याला उत्तर देत वाद वाढविला. त्यामुळे प्रक्षश्रेष्ठींनी त्यांची कानउघाडणी केली. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टिकेला केणेकर यांनी त्यास प्रत्युत्तर दिले. यामुळे वाद वाढला आणि मराठा कार्यकर्त्यांनी केणेकर यांच्या कार्यालयावर आंदोलन केले. केणेकरांच्या आक्रमकतेला तूर्तास लगाम घालण्याचे काम पक्षाने केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना फैलावर घेतल्याची चर्चा भाजप वर्तुळात होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24