आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विदर्भातील माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले , विधानसभेतील विरोध
.
किशोर कन्हेरे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात माळी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. माळी समाजाचे विदर्भात जवळपास पंचवीस लाख मतदार आहेत. माळी समाजाला सत्ताकारणात सर्वच राजकीय पक्षांनी दुर्लक्षित ठेवले. एक छगन भुजबळ वगळता एकही नेता माळी समाजातून राजकारणात स्वीकारला गेला नाही. छगन भुजबळ यांचे राजकारणही माळी समाजाऐवजी स्वकेंद्रित आणि स्वकुटुंब केंद्रित राहिले. छगन भुजबळ यांची विदर्भातील बाहुबली म्हणून ओळखले जाणारे किशोर कन्हेरे यांनी आपल्या समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी आज अखेर काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी सांगितले.

किशोर कन्हेरे यांनी जवळपास बारा वर्ष शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे प्रवक्ते म्हणूनही कार्य केले. शिवसेनेत विदर्भात फार लक्ष दिले जात नसल्याने आणि माळी समाजाचा उत्कर्ष करण्यासाठी राष्ट्रीय पक्ष सोबत असण्याची आवश्यकता लक्षात घेऊन किशोर कन्हेरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माळी समाजासाठी राष्ट्रीय स्तरावर कार्य करण्याची मनोकामना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आणि आपल्या समाजाला निश्चित न्याय देण्यात येईल याबाबत आश्वस्थ केले. महाराष्ट्रातील नेत्यांनी किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसला विदर्भात निश्चित खूप फायदा होईल आणि माळी समाजाला किशोर कन्हेरे यांच्या नेतृत्वात निश्चितपणे न्याय देण्यात येईल याबाबत खात्री व्यक्त करून किशोर कन्हेरे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत आनंद व्यक्त केला. दरम्यान, माजी आमदार कपिल पाटील यांनी देखील यावेळी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
