Mangesh Kulkarni passes away : प्रसिद्ध गीतकार आणि पटकथालेखक मंगेश कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वात मोठा शोक पसरला आहे. त्यांनी लिहिलेली गाणी आणि शीर्षकगीतं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. ‘आभाळमाया’, ‘वादळवाट’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांनी त्यांच्या प्रतिभेचा ठसा कायमचा सोडला आहे. मंगेश कुलकर्णी यांच्या शब्दांची जादू आणि संगीताची जुळवाजुळव एक अद्वितीय संरचना होती. त्यांच्या गाण्यांनी अनेकांच्या मनातील भावनांना वाट मिळवून दिली. त्यांच्या गीतांमुळे प्रेक्षकांच्या मानतील अनेक आठवणी जिवंत राहिल्या. त्यांच्या कामामुळे मराठी सृष्टीला एक नवा रंग आला होता, ज्यामुळे आजही त्यांच्या कामाची आठवण सगळ्यांच्या मनात आहे.