उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. वांद्रे येथील निर्मलनगर येथील आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दिकींवर गो
.
झिशान सिद्दिकी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्टमध्ये म्हणले आहे, त्यांनी माझ्या वडिलांना मारले. पण ते विसरत आहेत की ते सिंह होते आणि त्या सिंहाचा अंश माझ्यातही आहे. त्यांचा लढा माझ्या रक्तात वाहत आहे. ते नेहमी न्यायासाठी उभे राहिले. परिवर्तनासाठी लढले. या लढाईच्या काळात त्यांनी मोठ्या धैर्याने वादळांचा सामना केला. ज्यांनी माझ्या वडिलांना मारले त्यांनी असे समजू नये की ते जिंकले आहेत. त्यांना मला सांगायचे आहे की त्या सिंहाचे रक्त माझ्या धमण्यांमध्ये वाहत आहे. मी अजूनही इथेच आहे, निर्भय व ठामपणे उभा आहे. त्यांनी एकाला मारले, पण त्यांच्या जागी आता मी उभा आहे. ही लढाई आता संपणार नाही. माझे वडील जिथे होते, तिथेच आज मी उभा आहे, ठाम, निश्चल आणि पूर्ण तेयरीने, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पुढे त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातील लोकांना सांगितले की ते सदैव त्यांच्या सोबत आहेत.
दरम्यान, या आधी देखील झिशान सिद्दिकी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांचे घर वाचवताना आपला जीव गमावला आहे. माझे कुटुंब कोलमडले आहे. माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका, असे त्यांनी यापूर्वी म्हणले होते.