बडनेरा रेल्वेस्टेशन परिसरात घडलेल्या महिलेच्या हत्याकांडाचा उलगडाकरण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश आले. पत्नीला नुकतीच ओळखझालेल्या परपुरुषासोबत बघितल्याने पतीने संतापाच्या भरात तिची ओट्यावर डोके आपटून हत्या केल्याचे तपासात समोरआले. त्
.
लक्ष्मण मानसिंग मरावी, (३४) रा. ओहनी, मध्य प्रदेश असे आरोपी पतीचेतर भागवती लक्ष्मण मरावी (३८) असेमृताचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात आधी शेखरउर्फ चंद्रशेखर नारायण चिंचोळकर (३४)रा. इंदिरानगर झोपडपट्टी, बडनेरा यालाअटक केली होती.
बडनेरा रेल्वेस्टेशनवरील जुन्या वस्तीच्या बाजूनेतिकीट घराशेजारी पाण्याच्या टाकीजवळ१५ ऑक्टोबरला सकाळी एका महिलेचामृतदेह आढळला होता. मृत महिलेच्याशवविच्छेदन अहवालात डोक्यावरीलजखमांमुळे मृत्यू झाल्याचे नमूदअसल्याने तिची हत्या केल्याचे स्पष्ट झालेहोते. त्यानुसार बडनेरा पोलिसांनी गुन्हादाखल करून तपास आरंभला. गुन्हेशाखेचे युनिट दोन्ही या गुन्ह्याचा समांतर तपास करतहोते. तपासात रेल्वे स्टेशनवर पाणीबॉटल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याएका व्यक्तीच्या बयानावरून शेखरचिंचोळकरला अटक करून त्याचीचौकशी करण्यात आली. चौकशीतत्याने १४ ऑक्टोबरला घडलेल्याघटनेबाबत माहिती दिली. परंतु,त्यानंतरही मृत महिलेची ओळख नपटल्याने गुन्हे शाखेच्या युनिट दोननेत्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले.सीसीटीव्ही फुटेज, फोटो व अन्यमाहितीच्या आधारावर गुन्हे शाखेच्यायुनिट दोनला मृतक महिलेचीओळख पटवण्यात यश आले.
मृतक ही भागवती मरावीअसल्याचे समोर आल्यावर १७ऑक्टोबरला रात्री तिचा पतीलक्ष्मणला त्याच्या गावातून अटककेली. चौकशीत त्याने गुन्ह्याचीकबुली देत संपूर्ण घटनाक्रमसांगितला. लक्ष्मण मरावी हा पत्नीभागवतीसोबत कामाच्या शोधातअमरावतीत आला होता. ते दोघेबडनेरा परिसरात काम शोधत होते.१४ ऑक्टोबरला त्यांची बडनेरातीलभगतसिंग चौकात शेखर चिंचोळकरया व्यक्तीसोबत भेट झाली. तुम्हादोघांनाही काम मिळवून देतो, असेआश्वासन त्याने मरावी दाम्पत्यालादिले. त्याचवेळी शेखरने दोघांनाहीस्वतःच्या घरी थांबण्याचा आग्रहधरला.
पण, लक्ष्मणने त्याला नकारदेत आम्ही गावाला निघून जातो, असेम्हणत पत्नी भागवतीसह रेल्वेस्टेशनकडे निघाला. त्यावर मीतुम्हाला रेल्वे स्टेशनवर सोडून देतो,असे शेखरने म्हटले. त्यानंतर तिघेहीरेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यावेळीशेखरने लक्ष्मणच्या पत्नीकडून दारूआणण्यासाठी ५०० रुपये घेतले व तोतेथून निघून गेला. त्यानंतर लक्ष्मणनेगावी जाण्यासाठी गोंदियापर्यंतचे दोनतिकीट काढले. काही वेळाने शेखरदारू घेऊन आल्यावर तिघांनीहीवाहन तळानजीक पाण्याच्याटाकीखाली मद्यप्राशन केले. हीकारवाई गुन्हे शाखेच्या युनिट दोनचेपीआय बाबाराव अवचार यांच्यानेतृत्वात सपोनि महेश इंगोले,पीएसआय संजय वानखडे, दीपकसुंदरकर, गजानन ढेवले, आस्तिकदेशमुख, चेतन कराडे, संदीप खंडारेयांनी केली.
पत्नी आक्षेपार्ह स्थितीतदिसल्यावर विटेने ठेचले
लक्ष्मणला दारू चढल्याने तो तेथेच झोपीगेला. दरम्यान, काही वेळाने जागआल्यावर लक्ष्मणला पत्नी भागवतीआणि शेखर आक्षेपार्ह स्थितीत दिसले.लक्ष्मण शिव्या देत उठल्यावर शेखरतेथून पळून गेला. त्यानंतर लक्ष्मणनेरागाच्या भरात पत्नी भागवतीचे डोकेओट्यावर आपटले. तसेच विटेने तिच्याडोक्यावर वार केले. त्यानंतर लक्ष्मणपुन्हा झोपी गेला. १५ ऑक्टोबरला पहाटेउठल्यानंतर त्याला पत्नी भागवतीमृतावस्थेत दिसली. त्यामुळे तो गावीपळून गेला, असे तपासात समोर आले.