विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली असून आपल्या पक्षाकडून तिकीट न मिळाल्यास दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारी करत आहेत. अशात कोकणातील भाजपचे माजी आमदार राजन तेली
.
राजन तेली सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, महायुतीमध्ये ही जागाा शिवसेना शिंदे गटाकडे असणार आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, अशी मागणी तेली यांनी भाजपकडे केली होती. मात्र, पक्ष नेतृत्वाने त्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. त्यामुळे राजन तेली यांनी संधी मिळण्याची शक्यता फारच कमी होती. त्यामुळे राजन तेली यांनी गुरुवारी भाजपचा सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आता ते शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याची माहिती आहे.
राणे आणि तेली यांच्यात वादाची ठिणगी
राजन तेली एकेकाळी नारायण राणेंसोबत होते. राजन तेली आणि नारायण राणे दोघांनी सोबतच शिवसेनेला रामराम ठोकला होता. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. तसेच नारायण यांच्याकडून भाजपमध्ये माझे खच्चीकरण होत असल्याचा आरोप राजन तेली यांनी केला आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास सांवतवाडीमध्ये शिंदे गटाचे दीपक केसरकर आणि राजन तेली यांच्यात लढत पाहायला मिळेल.
तेली यांनी 2019 मध्ये अपक्ष लढवली निवडणूक 2019 मध्ये भाजप शिवसेना युती असल्यामुळे सावंतवाडीमधून दीपक केसरकर उभे होते. तर राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत त्यांना आव्हान दिले होते. या निवडणुकीत केसरकर यांना 69 हजार 784 मते मिळाली होती, तर राजन तेली यांनी 56 हजार 556 मते मिळवली होती. त्यामुळे यावेळी ठाकरे गटाने राजन तेली यांना संधी दिल्यास दीपक केसरकरांसमोर मोठे आव्हान असणार आहे.