मध्य रेल्वे रेल्वे स्थानकाजवळील एंट्री पॉइंट्स बंद करणार



रेल्वे स्थानकात जाण्यासाठी प्रवासी बेकायदेशीर एंट्री पॉइंट वापरतात. एंट्री पॉइंट म्हणून वापरला जाणारा 3 ते 4 फूट रुंद भाग मध्य रेल्वेकडून (central railway) बंद करण्यात येत आहे. मात्र एंट्री पॉइंट (entry point) बंद करण्यापासून रोखण्यासाठी वडाळा (wadala) येथे झोपडपट्टीतील रहिवासी (slum dwellers) रेल्वे रुळांवर आले.

सूत्रांनी सांगितले की, बुधवारी दुपारी 1 ते 1.30 च्या सुमारास रहिवाशांची गर्दी वाढली. त्यानंतर 50 ते 60 रेल्वे आणि शहर पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांना रेल्वेच्या आवारातून हाकलून दिले.

बुधवारी, मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांचे कर्मचारी वडाळ्यातील रावळी जंक्शनवर रेल्वेच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्यांना रोखण्यासाठी पाठवले. सकाळी 10 च्या सुमारास, त्यांनी काँक्रीटची भिंत बांधण्यासाठी मोजमाप करण्यास सुरुवात केली.

तेवढ्यात झोपडपट्टीतील रहिवासी बाहेर रस्त्यावर जमले आणि त्यांनी हा एंट्री पॉइंट बंद करण्याच्या प्रयत्नाला विरोध करण्यास सुरुवात केली. कारण हा एंट्री पॉइंट तेथील रहिवाशांसाठी रेल्वे स्थानकापर्यंत जाण्याचा सर्वात जवळचा पर्यायी मार्ग आहे.

“एक वेळ अशी आली की हे लोक रुळांवर आले आणि ट्रेनही थांबवली. आम्हाला बळाचा वापर करून त्यांना रेल्वेच्या आवारातून बाहेर काढावे लागले. स्थानिक राजकारणी देखील समस्या समजून घेण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी आले होते,” असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

जमावाला शांत केल्यानंतर अधिकारी कोणतेही काम न करता दुपारी तीन वाजता निघून गेले. या ठिकाणी फूट ओव्हर ब्रिजची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मी रेल्वे अधिकाऱ्यांना एक फूट ओव्हर ब्रिज बांधण्याचे सांगितले आहे. मला समजते की रेल्वे रूळ ओलांडणे जीवघेणे आहे, परंतु रेल्वेने याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजे,” असे सायन-कोळीवाडा विधानसभेचे आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन म्हणाले.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 महिन्यांच्या कालावधीत वडाळा रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत रुळ ओलांडताना 137 लोकांचा मृत्यू झाला आहे. वडाळा, चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर इत्यादी रेल्वे स्थानकांचा समावेश असलेल्या पोलीस ठाण्यांतर्गत या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत 32 जणांचा बळी गेला आहे. 


 हेही वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24