Liam Payne Passes Away: वयाच्या अवघ्या ३१व्या वर्षी प्रसिद्ध गायकाचे निधन, हॉटेलच्या बाल्कनीतून पडून दुर्दैवी अंत!


Singer Liam Payne Passes Away: ‘वन डायरेक्शन’या जगप्रसिद्ध म्युझिक बँडचा माजी सदस्य लियाम पेन याचे निधन झाले आहे. बुधवारी अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्स येथील हॉटेलच्या बाल्कनीतून पडून गायकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक मीडियानुसार, गायक लियाम त्याच्या हॉटेल कासा सुर पालेर्मोमध्ये थांबला असताना हा अपघात घडला. या हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून पडून लियामचा मृत्यू झाला. ब्यूनस आयर्सच्या सार्वजनिक आपत्कालीन वैद्यकीय हेल्पलाइनच्या प्रमुखाने दिलेल्या निवेदनात गायकाच्या मृत्यूची पुष्टी केली गेली आहे. गायक लियाम पेन अवघ्या ३१ वर्षांचा होते. दुसरीकडे, गायकाच्या आकस्मिक मृत्यूवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बाल्कनीतून पडणे हा अपघात होता की, कट होता याचा शोध घेण्यासाठी स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24