शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे इस्लामपूर येथे आली आहे. यावेळी सभेपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह काही कमी झालेला पाहायला मिळाला नाही. भर प
.
भाषणावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी जयंत पाटीलच भावी मुख्यमंत्री होणार, असा दावा केला आहे. अमोल कोल्हे म्हणाले, वाळव्याचा माणूस वर्षावर जावा पण पावसाच्या रुपाने वर्षाच वाळव्यात आली. नियतीच्या मनात आहे. त्यामुळे तुम्हाला ताकद लावावी लागेल असे अमोल कोल्हे जयंत पाटील यांना उद्देशून म्हणाले. यावेळी व्यासपीठावर पक्षाध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते.
पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, काही दिवसांपूर्वी पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार होती, मात्र पावसामुळे ती सभा रद्द करण्यात आली. पण इस्लामपूरमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यानंतर देखील शरद पवारांची सभा झाली. हरियाणामध्ये जे झाले ते महाराष्ट्रात होणार नाही, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवारांच्या विचारांमुळे शिवस्वराज्य सभेला राज्यभरात भरभरून प्रतिसाद मिळाला. आता मतदारसंघात पुन्हा सभा घेण्याची गरज नाही, इतके प्रेम लोकांनी दिले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक ही आता महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी असल्याचे अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, सभेच्या आधी जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी डोक्यावर खुर्ची घेतली, मात्र सभा सोडून कोणी गेले नाही. जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. जयंत पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी भर पावसात उभे राहून दिल्याचे चित्र पाहायला मिळाले.