महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा रूपाली चाकणकर यांच्यावर: 3 वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच गॅजेट प्रसिद्ध – Mumbai News


महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. सध्या या आयोगाची जबाबदारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर आहे. येत्या 22 तारखेला चाकणकर य

.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच महायुतीच्या वतीने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी सात आमदारांचा शपथविधी काल पार पडला. त्यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना देखील विधान परिषदेची आमदारकी मिळणार? अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातीलच महिला नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे ऐनवेळी त्यांचे नाव या यादीतून वगळण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हे पद पुढील तीन वर्षे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 1993 मध्ये महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी, महिला हक्कांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 1993 मध्ये या महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिलांवर होणारे अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी महिला हक्कांसाठी हा आयोग काम करतो. त्यामुळे या आयोगाला अनेक अधिकार देखील देण्यात आले आहेत. राज्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे पद तेवढेच महत्त्वाचे देखील मानले जाते.

राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा….

काँग्रेसच्या स्क्रिनिंग कमिटीची आज दिल्लीत बैठक:125 उमेदवारांच्या नावावर चर्चा, 17 ऑक्टोबरला उमेदवारांची यादी जाहीर होणार?

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या घोषणेने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यातच महाविकास आघाडीत 220 जागांवर एकमत झाले आहे. तिन्ही पक्ष यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या या जागांवर उमेदवार निवडीची प्रक्रिया पुढे नेत आहेत. पूर्ण बातमी वाचा…

मायावतींकडून महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचा नारा:निवडणूक लढवणार असल्याची घोषणा; निष्पक्ष निवडणुकांची अपेक्षाही केली व्यक्त

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची काल घोषणा झाली असून त्यासोबतच राजकीय पक्षांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षानेही मोठी घोषणा केली आहे. बसपा महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवेल, म्हणजेच महायुती किंव महाआघाडीत सामील होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24