Bigg Boss 18 Mid Week Eviction : छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो’बिग बॉस १८’ला जोरदार सुरुवात झाली आहे. या घरात रोजच काही ना काही कारणांनी वाद होताना पाहायला मिळतात. मात्र, आता स्पर्धकांना धक्का बसताना दिसणार आहे. ‘बिग बॉस १८’च्या घरात आता ‘मिड वीक एलिमिनेशन’ होणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार, बिग बॉसने रेशन मिळवण्याच्या बदल्यात घरातील स्पर्धकांना दोन पर्याय दिले आहे. बिग बॉस म्हणतात की, ‘संपूर्ण कुटुंबाला घरात रेशन मिळावं आणि तुमचं भविष्य चांगलं असावं, असं तुम्हाला वाटत असेल तर कुटुंबातील दोन सदस्यांना आत्ताच तुरुंगात डांबून ठेवावं लागेल किंवा नॉमिनेट सदस्यांपैकी एकाला या वेळी घराबाहेर काढावं लागेल.’