पवन पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री: उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी मध्यरात्री मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली दोघांमध्ये भेट झाली यादरम्यान दोघांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री उदय सामंत यांच्या सोबत मुख्यमंत्री यांचे ओसडी मंगेश चिवटे ही उपस्थित होते.
अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाल आहे. आचारसंहितापूर्वी मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. दोघांच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली अद्याप समजू शकले नाही.
सोमवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत हे घनसावंगी मतदारसंघात हिकमत उढाण यांच्या पक्षप्रवेश मेळाव्यास आले होते. त्याच मध्यरात्री उद्योग मंत्री उदय सामंत व मुख्यमंत्री यांची ओएसडी मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगे यांची भेट घेऊन दोन तास चर्चा केली.