अतुल परचुरे यांच्या कामाविषयी
अतुल परचुरे यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांनी अळी मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका केली. त्यानंतर कापूसकोंड्याची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझं आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ती आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या प्रसिद्ध नाटकांमध्ये ते दिसले होते. आज १४ ऑक्टोबर रोजी अतुल यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे.