उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजता एच एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील हार्ट ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहित
.
उद्धव ठाकरे यांना मागील दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्याने आज सकाळी मुंबइतील रिलायन्स हरिकिसन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेजस आढळून आहे. त्यानंतर ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात भरती असून डॉक्टरांची टीम त्यांची काळजी घेत आहे. ठाकरेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
ठाकरेंवर 12 वर्षांनी अँजिओप्लास्टी
यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. त्यानंतर आता 12 वर्षांनंतर त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.
दसरा मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर डागली तोफ
मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. सरकार धारावीच्या माध्यमातून मुंबईला लुटण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. अदानींना काय दिले नाही? सारी जमीन अदानींची होत आहे. मुंबई आम्हाला अदानीने दिलेली नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढून आपण हे साध्य केले आहे. मी स्वतःसाठी लढत नाही. मी मुंबईसाठी लढत आहे. माझे सरकार येताच मी धारावीची निविदा रद्द करेन, असे ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा…
राज्याचा राजाच गुंडांचा सेनापती:..ते राज्य सुरक्षित व सुसंस्कृत कसे राहणार?, मुख्यमंत्री शिंदेंनी पोलिस खात्याचे गुन्हेगारीकरण केले- ठाकरे गट
ज्या राज्याचा राजाच गुंडांचा ‘शेणापती’ म्हणून काम करतो ते राज्य सुरक्षित व सुसंस्कृत कसे राहणार? महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा–सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आधी पोलिस खात्याचे गुन्हेगारीकरण केले, त्याच गुन्हेगारांना बळ देऊन राजकारण सुरू केले, असा आरोप ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आला आहे. पूर्ण बातमी वाचा…