पुण्यात साडेचार कोटींचे सोने महसूल गुप्तचर संचलनालयाकडून जप्त: 4 जणांना अटक, तळेगाव टोल नाका परिसरात कारवाई – Pune News



महसूल गुप्तचर संचालनालयाच्या(डीआरआय) पथकास मिळालेल्या माहितीनुसार ,तस्करी करुन आणलेले चार कोटी 47 लाख रुपयांचे सहा किलो वजनाचे सोने तळेगाव टोल नाका परिसरात जप्त केले. मुंबईहून पुण्यात बसने तस्करी करुन आणलेले सोने पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळा

.

याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध सीमाशुल्क अधिनियम 1962 च्या तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून तस्करी करुन आणलेले सोने खासगी बसने पुण्यात पाठविले जाणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने तळेगाव टोलनाका येथे सापळा लावून कारवाई केली. बसमधील संशयित व्यक्तींची झडती घेण्यात आली. तेव्हा दोन पाकिटात सोने सापडले. औषधी कॅप्सुलमध्ये सोन्याची भुकटी भरल्याचे उघडकीस आले. ‘डीआरआय’च्या पथकाने चौकशी केली. त्यानंतर तस्करी करुन आणलेले सोने पुरविणारा, त्याच्या साथीदारांना मुंबई आणि पुण्यातून अटक करण्यात आली. चौघे आरोपी तस्करी करुन आणलेल्या सोन्याची विक्री करत असल्याची माहिती तपासात मिळाली.

त्यांच्याकडून पाच किलो 918 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत चार कोटी 47 लाख रुपये आहे. तस्करीतून मिळालेली 22 लाखांची रोकड आरोपींकडून जप्त करण्यात आली.

दिवाळीत सोन्याला मागणी

दिवाळीत सोन्याला मागणी वाढते. सणाच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली जाते. सोने खरेदीतून सराफ बाजारात मोठी उलाढाल होते. सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. तस्करी करुन आणलेले सोने कोणाला देण्यात येणार होते, यादृष्टीने ‘डीआरआय’च्या पथकाकडून तपास करण्यात येत आहे. यापूर्वी दुबईहून तस्करी करून आणलेले सोने केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर जप्त केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24