Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मुंबईकरांसाठी मोठी घोषणा; पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी



राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध सुरु झाले असून कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. यामुळे आज होत असलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 

मुंबईत येणाऱ्या पाचही टोलनाक्यांवरून ये-जा करणाऱ्या हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. याचा फायदा मुंबईत नागरिकांसोबतच मुंबई बाहेरून मुंबईत येणाऱ्या वाहनांना होणार आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून होणार अंमलबजावणी होणार आहे. या टोलमाफीतून अटल सेतू वगळण्यात आला आहे.

दीड दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंना हा मुद्दा उचलला होता. मुंबईत एवढी वाहने येतात-जातात त्याचा हिशेब त्यांनी राज्य सरकारकडे मागितला होता. तसेच हे टोल बंद करण्याची मागणी करत टोलनाक्यांवर कॅमेरे लावून वाहनांची मोजणी केली गेली होती. यानंतर काही महिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे. याचा छोट्या कार चालकांना मोठा फायदा होणार आहे. 

Web Title: Big Breaking, Mumbai Toll Free From Tonight: CM Eknath Shinde Cabinet meeting big announcement for Mumbaikars; Huge toll exemption for cars at all five toll booths entering mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24